Birthday Quotes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Quotes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Birthday Quotes In Marathi: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं युथ मराठी च्या नवीन पोस्ट मध्ये. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत Birthday Quotes In Marathi.

मित्रांनो प्रत्येक वेळेस आपल्या मित्रमंडळी मध्ये किंवा नातेवाईकांमध्ये कोणाचा न कोणाचा वाढदिवस येत असतो आणि आपल्या प्रत्येकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाठवण्यासाठी कोट्स हवे असतात. तर आज आम्ही आपल्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Marathi birthday wishes in marathi चे सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहोत. तुम्हाला हे मराठी बिर्थडे कोट्स खूप आवडतील अशी आशा करतो.


Birthday Quotes In Marathi


जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..

आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..

शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..

आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे.. 

आपली सर्व  स्वप्न साकार व्हावी हि एकच आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे प्रार्थना. आजचा वाढदिवस आपल्या आयुष्यातील एक अनमोल दिवस म्हणून आठवणीत रहावा, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं.  वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा 

आजच्या या खास दिवशी तुम्हाला वाढदिवसाच्या  हार्दिक शुभेच्छा. मी आशा करतो की आपण आपल्या सकारात्मकतेने, प्रेमाने आणि सुंदरतेणे  इतरांचे जीवन बदलत रहाल. मनः पूर्वक शुभेच्छा.

उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो, आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा...

तुझा वाढदिवस म्हणजे आहे आनंदाचा झुळझुळनारा झरा, सळसळणारा शीतल वारा !  तुझा वाढदिवस म्हणजे जसा जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा ।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।

शिखरे उंच यशाची सर तुम्ही करावी, कधी वळून पाहिले असता आमची शुभेछ्या स्मरावी

Birthday Wishes In Marathi


वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो, आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो, जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो, आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो.  ।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण ट्रकच तुझ्यासाठी पाठवलाय! यशस्वी व औक्षवंत हो! वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!

नातं आपल्या मैत्रीचे  दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे  तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे.. 

आपण सर्वांचेच वाढदिवस आपण साजरे करतो… पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.  कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात. जसा तुझा वाढदिवस. ।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।। 

पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा,।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे....... तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा उंचच उंच भरारी घेऊ दे, तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होऊदेत, मनात आमच्या फक्त एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे.

तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास, ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास, मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा !

Happy Birthday In Marathi


वाढदिवस ही एक नवीन सुरुवात आहे,  आणि नवीन आकांशा,धैर्य, उत्साहासोबत नवीन ध्येय गाठण्याची सुरुवात आहे. ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 

दिवस आहे आजचा खास, उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास. ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 

तुमच्या सर्व इछ्या व आकांक्षा गगनाला भिडू दे, जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे, तुम्हाला दीर्घआयुष्य, सुख, समृद्धी लाभो ही सदिच्छा.

नवी क्षितीज नवी पाहट, फुलत राहावी तुझ्या आयुष्यातील स्वप्नांची वाट कायमच स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहूदे,  पाठीशी तुमच्या हजारो सुर्य तळपत राहूदे हीच प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

नवी क्षितीज नवी पाहट, फुलत राहावी तुझ्या आयुष्यातील स्वप्नांची वाट कायमच स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहूदे,  पाठीशी तुमच्या हजारो सुर्य तळपत राहूदे हीच प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

सुख – समृद्धी – समाधान – धनसंपदा– दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो! वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा


Final Words: तुम्हाला हे Birthday Quotes In Marathi खूप आवडले असतील अशी आशा करतो. पोस्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत पोस्ट share करायला विसरू नका. धन्यवाद!टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या