Friendship Quotes In Marathi | मैत्री कोट्स मराठीFriendship Quotes In Marathi Friendship Quotes In Marathi: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं युथ मराठीच्या नवीन पोस्ट मध्ये. तर मैत्री हा मनुष्याच्या जीवनातील खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि मित्र मैत्रिणी आपल्या जीवनाचा खूप सुंदर भाग असतात. त्यांच्याशी आपण गप्पा करतो, मस्ती करतो, भांडतो आणि त्यांच्यावर आपण प्रेमही तितकंच करतो. आपल्या जीवनातील भरपूर अनुभव आणि secrets आपण त्यांच्या बरोबर share करतो. मित्रांजवळ आपण आपलं मन मोकळं करत असतो. आपल्या जीवनात मैत्री हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि चांगले मित्र आपलं जीवन बदलवू शकतात. 

तर अशाच आगळ्या वेगळया मैत्रिबद्दल आज आम्ही घेऊन आलो आहोत Friendship Quotes In Marathi. तुम्ही हे कोट्स आपल्या मित्रांसोबत share करू शकता. तुम्हाला हे कोट्स खूप आवडतील.


Friendship Quotes In Marathi
"मैत्री तेव्हा जन्मते जेव्हा एक मनुष्य दुसर्‍याला म्हणतो

"काय! तूसुद्धा? मला वाटलं होतं की माझ्याशिवाय कोणीही नाही."

"जीवनाची सर्वात मोठी भेट म्हणजे मैत्री"


Friendship status in Marathi

 

"एका निष्ठावान मित्रांची किंमत दहा हजार नातेवाईकांची असते."


मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी,

प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी

एकवेळेस ती भांडणारी असावी.

पण कधीच बदलणारी नसावी.

मित्र म्हणजे कुणीतरी सुखात साथी होणार

आणि दुखःमध्ये सुद्धा आपल्या अधिक जवळ येणार.


नुसता रुबाबच ‬नाही तर धमक पण आहे .

आणि नुसता पैसा नाही तर, मनाची श्रीमंतीपण आहे .

आणि म्हणुनच तुम्ही‪ मित्र‬ असल्याचा

नुसता गर्वच नाही तर‪ माज‬पण आहे.


तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात माझ्या मैञीचे एकच पान असु दे,

सुवर्णाक्षराने नको प्रेमाच्या शाईने लिहिलेले असु दे.

त्या पानाची कडा थोडी दुमडून ठेव,

आठवण माझी येईल तेव्हा सहजपणे तेच पान उघडून ठेव!


मैत्रिण असावी तुझ्यासारखी

आपलेपणाने सतावणारी..

रागावलास का? विचारुन,

तरीही परत परत चिडवणारी..


कोणीतरी एकदा विचारलं मित्र आपला कसा असावा,

मी म्हणालो आरशा सारखा प्रामाणिक गुण दोष दोन्ही दाखवणारा.


लक्षावधी वर्षानी एखादा सुर्य निर्माण होतो,

कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,

हजारो शिँपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,

शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण त्यात,

तुझ्या सारखा मिञ एखादाच असतो.


मैत्री असावी चंदनासारखी,

सुगंध देणाऱ्‍या फुलासारखी,

जशी तुटलेल्या ताऱ्याला आधार देणाऱ्या धरतीसारखी,

प्रकाशाचे तेज घेऊन सावलीसारखी कोमल असावी.


काट्यांवर चालून दुसऱ्यासाठी

रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री.

तिखट लागल्यावर घेतलेला

पहिला गोड घास म्हणजे मैत्री.

एकटे असल्यावर झालेला खराखूरा भास म्हणजे मैत्री.

मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री.सागराचे पाणी कधी आटणार नाही,

मनाची आठवण कधी मिटणार नाही,

एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,

तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.


Maitri Status

निर्सगाला रंग हवा असतो.

फुलांना गंध हवा असतो.

माणुस हा एकटा कसा राहणार, कारण

त्यालाही मैञीचा छंद हवा असतो.


 मैत्री असावी मना मनाची,

मैत्री असावी जन्मो जन्माची मैत्री असावी

प्रेम आणि त्यागाची अशी मैत्री असावी

फक्त तुझी आणि माझी.


जीवनात दोनच मित्र कमवा…

एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी

युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल आणि

दुसरा ” कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही

तुमच्यासाठी युध्द करेल..काही शब्द नकळत कानावर पडतात

कोणी दूर असुनही उगाच जवळ

वाटतात खर तर ही मैञीची नाती

अशीच असतात आयुष्यात येतात

आणि आयुष्यच बनून जातात.
मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली

तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली

रात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेली

तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनी खुललेली..


मित्र म्हणजे एक आधार

एक विश्वास एक आपुलकी

आणि एक अनमोल साथ

जी मला मिळाली तुज्या रूपाने.काही नाती बनत नसतात.

ति आपोआप गुंफली जातात…

मनाच्या ईवल्याशा कोपऱ्यात

काहि जण हक्काने राज्य करतात.

त्यालाच तर “मैत्री” म्हणतात.


मैत्री म्हणजे पान नसते सुकायला,

मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला,

sमैत्री म्हणजे फळ नसते पिकायला,

मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला,

मैत्री म्हणजे मुळ असते

एकमेकांना आधार द्यायला..


मैत्री म्हणजे मायेची साठवण,

मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण

हा धागा नीट जपायचा असतो,

तो कधी विसरायचा नसतो

कारण ही नाती तुटत नाहीत,

ती आपोआप मिटून जातात

जशी बोटांवर रंग ठेवून

फुलपाखरे हातून सुटून जातात..


मनाच्या तारा जुळून आलेल्या,

सहवासाचा एक मधुर राग छेडलेला,

संगतीत तुझ्या फुललेले जीवन,

तुझ्या माझ्या मैत्रीचा वेल गगनाशी भिडलेला.


Friendship Status In Marathi


रक्ताची नाती जन्माने मिळतात,

मानलेली नाती मनाने जुळतात,

पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,

त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.


खरच मैत्री असते

पिंपळाच्या पाना सारखी त्यांची किती

ही जाळी झाली तरी,

ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटती.


रक्ताच्या नात्यात नसेल एवढी

मैत्रीच्या नात्यात ओढ असते,

कशी ही असली तरी

शेवटी मैत्री गोड असते.


 पावसात जेवढा ओलावा नसेल,

तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो,

आणि मैत्रीच्या सावलीचा आंनद उन्हात गेल्यावरच कळतो.


चांगले मित्र,

हात आणि डोळे प्रमाणे असतात

जेव्हा हाताना यातना होतात

तेव्हा डोळे रडतात आणि जेव्हा

डोळे रडतात तेव्हा हात अश्रू पुसतात. 


बहरू दे आपलं मैत्रीचं नातं

ओथंबलेले मन होऊ दे रित

अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ

घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात.


आयुष्यात माझ्या कधी दुःखाची लाट होती,

कधी अंधाराची रात होती,

सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती

तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती.


मैत्री करत असाल तर

पाण्या सारखी निर्मळ करा..

दूर वर जाऊन सुद्धा

क्षणों क्षणी आठवेल अशी करा..Friendship Quotes In Marathi | मैत्री कोट्स मराठी


Final Words: आशा करतो तुम्हाला हे Friendship Quotes In Marathi आवडले असतील आणि हे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत share कराल. धन्यवाद!


अधिक बघा:


Motivational Quotes In Marathi


Love Quotes In Marathi


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या