Good Morning Quotes In Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा

Good Morning Quotes In Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा


Good Morning Quotes In Marathi: नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं युथ मराठीच्या नवीन पोस्ट मध्ये. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत Good morning quotes in Marathi.

मित्रांनो आपल्याला सकाळी उठल्यावर आपल्या आवडत्या व्यक्तीला सुविचार पाठवण्याची इच्छा असते आणि आपल्याला रोज नवनवीन मराठी messages हवे असतात. सकाळी सकाळी एखादा चांगला सुविचार किंवा message वाचला तर आपल्या दिवसाची सुरुवात उत्साहाने होते. 

तर आज आम्ही असे भरपूर मराठी गुड मॉर्निंग कोट्स घेऊन आलो आहोत. जे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना मित्रांना पाठवू शकता. आणि त्याच्या दिवसाची सुरुवात एका चांगल्या विचाराने सुरू करण्यास मदत करू शकता. तुम्हाला हे शुभ सकाळ कोट्स आवडतील आणि तुम्ही सुप्रभात संदेश आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवाल अशी आशा करतो.


Good Morning Quotes In Marathi


जीवनाच्या मैफिलीत आज 

सारी गणिते उजवी ठरली 🎭🌹

बेरीज आणि वजाबाकी आज

श्वासांमध्ये अडकून पडली 

शुभ सकाळ


दुस-यांपेक्षा आपल्याला यश जर

ऊशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका...

हा विचार करा की घरा पेक्षा

राजवाडा तयार व्हायला वेळ जास्त लागतो..

शुभ सकाळ


 भाकरीचं गणितंच वेगळं आहे...

कोण ती कमवायला पळतायत तर...कोण ती पचवायला!

|| शुभ प्रभात || 


जिव्हाळा हा घरचा कळस आहे.

माणुसकी ही घरातील तिजोरी आहे.

गोड शब्द हे घरातील धनदौलत आहे.

शांतता ही घरातील लक्ष्मी आहे.

पैसा हा घरचा पाहुणा आहे.

व्यवस्था ही घराची शोभा आहे.

समाधान हेच घरचे सुख आहे.

शुभ सकाळ

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 

सुप्रभात संदेश "निवड" "संधी" आणि "बदल" या तीनही पण महत्वाच्या गोष्टी आहेत.

"संधी" दिसता "निवड" करता आली तर "बदल" आपोआप होतो.

"संधी" समोर दिसुनही ज्याला "निवड" करता येत नाही

त्याच्यात कधीच "बदल" घडत नाही....

!! शुभ सकाळ !!


डोळे कितीही छोटे असले तरीही,

एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते,

आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे,

जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी,

दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते,

फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.

| शुभ सकाळ |Good Morning Marathi Quotes


डोंगरावर चढणारा झुकूनच चालतो

पण जेव्हा तो उतरू लागतो तेव्हा ताठपणे उतरतो....

कोणी झुकत असेल तर समजावे की तो उंचावर जात आहे

आणि कोणी ताठ वागत असेल तर समजावे की तो खाली चालला आहे....

Shubh Sakal


सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,

ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.

तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,

जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते

आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची

आणि ध्येयाची सुरूवात असते.

शुभ प्रभात..

आपला दिवस आनंदी जावो. 


किती दिवसाचे आयुष्य असते?

आजचे अस्तित्व उद्या नसते,

मग जगावे ते हसून-खेळून कारण

या जगात उद्या काय होईल

ते कोणालाच माहित नसते..

म्हणुन आनंदी रहा....

।। आपला दिवस आनंदी जावो ।।

नव्हे तर,

आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो.

शुभ सकाळ 


लिहल्याशिवाय

दोन शब्दातील अंतर

कळतच नाही तसेच

हाक आणि हात दिल्याशिवाय

माणसाचे 💓 मनही जुळत नाही

सुप्रभात संदेश


स्वर्गापेक्षा जास्त प्रेम मी

माझ्या जोडलेल्या माणसावर करतो

कारण स्वर्ग आहे की नाही

हे कोणाला माहीत नाही

परंतु जीवाला जीव देणारी "माणस"

माझ्या आयुष्यात आहे

Shubh Sakal


आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं

आणि जे आपल्या माघारी चर्चिल जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं

आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर

आपल्या अस्तित्वाला सुध्दा नेहमी लोकांचा सलाम असतो....!

सुप्रभात संदेश


Suprabhat Quotesजेव्हा काही लोक आपली फक्त

गरज लागल्यावर आठवण काढतात तेव्हा

वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा कारण

एक मेणबत्तीची आठवण फक्त अंधार

झाल्यावरच येतो. गुड मॉर्निंग


गवत उगवण्यास

एक पावसाची सर खूप होते पण

वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर लागतो

गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु

वड उशिरा उगवतो आणि हजारो वर्षे जगतो

तसेच चांगले विचार आणि चांगले माणसे

समजण्यासाठी खूप उशीर लागतो

पण एकदा समजले की आयुष्यभर

विसरत नाही

सुप्रभात संदेश


रोजच "शुभ सकाळ" म्हणल्यावर दिवस

चांगला जातो असे काही नाही किंवा

पाठवणारा खूप मोठा तज्ञ असतो असे नाही

पण शुभ सकाळ पाठवताना आपण

ज्यांना पाठवतो ती व्यक्ती डोळ्यासमोर येते...

तेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखे वाटते,

म्हणूनच आपणास शुभ सकाळकधी आठवण करु शकलो नाही तर स्वार्थी समजू नका....!!!

वास्तवात या लहानशा जीवनात अडचणी खुप आहेत...!!!

मी विसरलो नाही कुणाला....!!!

माझे छान मित्र आहेत जगात...!!!

फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे,

सुखाच्या शोधात...!!!

|| शुभ सकाळ ||


शुभ सकाळ शुभेच्छा


चांगल्या माणसावर एवढा विश्वास

ठेवा जेव्हढा तुम्ही आजारपणात गोळ्यांवर ठेवता

कारण गोळ्या जरी असल्या तरी त्या

आपल्या फायद्याच्याच असतात.

अगदी तसच चांगल्या माणसाच असतं


"चांगलेच होणार होणार आहे" हे

हे गृहीत धरून चला,बाकीचे

परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास

मनात असला की येणारा प्रत्येक

क्षण आत्मविश्वासाचा असेल !!!!!


माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांचे दोन कारण असते"

एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असत

आणि दुसरं म्हणजे ते वेळच्या आधी हवं असतं "!!*

शुभ सकाळ 


 तुम्ही खूप शक्तिशाली असाल,

पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.

एका झाडापासून लाखो माचिसच्या काड्या बनवता येतात.

पण एक माचिसची काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते.

कोणी कितीही महान झाला असेल,

पण निसर्ग कोणाला कधीच महान बनण्याचा क्षण देत नाही.

|| शुभ सकाळ || 


माणूस एकदा देव म्हणाला

तुझे रूप धरणीवर कुठे दिसेन

देव म्हणतो माणसाला

एकदा आई-बाबाचा चरणी माथा ठेव

माझे रूप त्यांच्यातच असेल!!!!!


लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले 

विचार असून उपयोग नाही

तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी

चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे..

 !! शुभ सकाळ !! 


मला कोणाची गरज नाही

हा "अहंकार" आणि

सर्वांना माझी गरज आहे हा

"भ्रम"

या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर

माणूस आणि माणुसकी 

लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही.


Good Morning Massage in Marathi


सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी

गांभीर्याने ऐकत नाही,

आणि स्तुती एक असा धोका आहे

ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो!!!


चांगले मित्र आणि औषधे ही

आपल्या आयुष्यातील वेदना

दूर करण्याचे काम करतात.....

फरक इतकाच की,

औषधांना एक्स्पायरी डेट असते,.....

पण मैत्रीला नाही.

GOOD MORNINGखरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते...

कुठल्याही रंगात मिसळले

तर दरवेळी नवीन रंग देतात...

पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही

पांढरा रंग तयार करता येत नाही!

अशा सर्व 'शुभ्र...स्वच्छ...प्रामाणिक..

जीवाला जीव देणा-या

आपल्या माणसांना..

शुभ सकाळ ~ Good Morning Quotes In Marathi


आरसा आणि हृदय

दोन्ही तसे नाजूक असतात....

फरक एवढाच,

आरशात सगळे दिसतात,

आणि हृदयात फक्त आपलेच

दिसतात.... ~ Good Morning Quotes In Marathi


शुभ सकाळ म्हणजे, शब्दांचा "खेळ"

विचारांची चविष्ट ओळी "भेळ"

मनाशी मनाचा

सुखद "मेळ".....आणि,

आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी ,

सकाळचा काढलेला,

थोडासा वेळ ...! - Good Morning Quotes In Marathi


Final Words: आशा करतो तुम्हाला हे Good Morning Quotes In Marathi आवडले असतील आणि पोस्ट आवडल्यास तुमच्या मित्रांसोबत share करा. तुमच्याकडे काही छान मॅसेज असतील तर कॉमेंट मध्ये नक्की सुचवा धन्यवाद!अधिक बघा: 


Good Night Quotes In Marathi


Friendship Quotes In Marathi


Love Quotes In Marathi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या