Marathi Ukhane For Female: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं Youth Marathi च्या नवीन पोस्ट मध्ये. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत Marathi Ukhane For Female.
मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात नवविवाहित दाम्पत्याने आपल्या नवऱ्याबद्दल किंवा नवरीबद्दल दोन वाक्यात बोलायचं अशी एक मजेशीर प्रथा चालत आलेली आहे. त्याच बोलल्या जाणाऱ्या दोन वाक्यांना उखाणे म्हणतात.
तर लग्नाच्या वेळी उखाणे काय बोलावे असा नवविवाहित दाम्पत्याला विचार पडतो. म्हणून आज आम्ही नवरीसाठी खूप सारे उखाणे घेऊन आलो आहोत. त्यातील तुम्हाला आवडतील ते उखाणे तुम्ही आपल्या लग्नासाठी किंवा तुमच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी निवडू शकता.
तुम्हाला हे Ukhane in Marathi for female खूप आवडतील अशी आशा करतो.
Marathi Ukhane For Female
लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी,
.... रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी.
❤❤❤❤
स्वच्छता आणि टापटीप अरोग्याचे मूळ,
.... रावांसाठी सोडले माहेरचे मूळ.
❤❤❤❤
सकाळच्या वेळी बागेत फूल तोडी माळी,
.... रावांचे नाव घेते .... वर आली पाळी.
❤❤❤❤
संसार रुपी सागरात प्रितीच्या लाटा,
.... च्या सुखदुःखात उचलीन अर्धा वाटा.
❤❤❤❤
सुखदुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले,
.... च्या संसारात भाग्य माझे हसले.
❤❤❤❤
रुपयाच्या वाटीत सोन्याचा चमचा,
.... नाव घेऊन आशीर्वाद मागते सर्वांचा.
❤❤❤❤
प्रितीच्या झुळ्यात कळीचं फूल झालं,
.... ज्या संगतीने जीवन सार्थक झालं.
❤❤❤❤
प्रेम रुपी सागर, संसार रुपी सरिता,
.... च नाव घेते खास तुमच्याकरिता.
❤❤❤❤
लक्ष्मी शोभते दाग-दागिन्याने, विद्या शोभते विनयाने,
.... च नाव घेते तुमच्या आग्रहाने.
❤❤❤❤
अगं अगं मैत्रीणीबाई, तुला सांगते सर्व काही,
.... राव मिळाले तरी तुला विसरत नाही.
❤❤❤❤
संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती,
.... शी लग्न झाले, झाली इच्छापूर्ती.
❤❤❤❤
दारातील तुळशीला पाणी घालते गार,
.... रावांच्या नावाला रात्र झाली फार
❤❤❤❤
संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी,
.... च्या जीवावर घालेन मणी-मंगळसूत्राची जोडी.
❤❤❤❤
मनासारखा मिळाला जोडीदार, कृपा देवाची मानते,
.... चे पत्नी पद अभिमानाचे मिरवते.
❤❤❤❤
देह तुळशीचा, वसा चंदनाचा, शब्द करुणेचा,
.... नाव घेते असावा आर्शिवाद सर्वाचा.
❤❤❤❤
सुवर्णाच्या कोंदणात हिरा शोभतो छान,
.... चं नाव घेऊन राखते सर्वांचा मान.
❤❤❤❤
Marathi Ukhane For Bride
नागपूरची संत्री, जळगावची केळी,
.... रावांचं व माझे ‘शुभमंगल’ झालं गोरज मुहूर्ताच्या वेळी.
❤❤❤❤
भाव तेथे शब्द, शब्द तेथे कविता,
.... रावांचे नाव घेते, खास तुमच्या करिता
❤❤❤❤
जीवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते,
सगळ्यांचा मान राखून नाव .... रावांचे घेते
❤❤❤❤
राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा,
.... रावांचे नाव घेते, आशिर्वाद द्यावा सौभाग्याचा
❤❤❤❤
हरीश्रंद्र राजा, रोहिदास पुत्र,
.... रावांच्या नावाने घालते मंगळसूत्र
❤❤❤❤
काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून,
.... रावांचं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून
❤❤❤❤
सासुरवाशीन मुलीने राखावा थोऱ्यामोठ्यांचा मान,
.... रावांना कन्या केली माझ्या आईवडिलांनी दान
❤❤❤❤
वाऱ्यासंगे ताऱ्यासंगे छेडीत जातो छंद मनाचा,
.... रावांसंगे हात गुंफून मार्ग चालते नवजीवनाचा
❤❤❤❤
सोन्याची अंगठी रुप्याचे पैंजण,
.... रावांचे नाव घेते ऐका सारेजण
❤❤❤❤
आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास,
.... रावांना भरविते जिलेबिचा घास
❤❤❤❤
अनेकांनी लिहिली काव्ये, गायली सौंदर्याची महती,
काल होते मी युवती, आज झाले .... रावांची सौभाग्यवती
❤❤❤❤
अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना,
.... रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना
❤❤❤❤
मंगळसूत्राच्या दोन वाट्यात सासर-माहेरचा संगम,
.... रावांच्या सहवासात माझ्या आनंदाचा उगम
❤❤❤❤
सौभाग्याचे काळे मणी घातले गळा,
.... रावांच्या नावाने लावीते कपाळी लाल टीळा
❤❤❤❤
लग्नात लागतात हार आणि तुरे,
.... रावांचे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे
❤❤❤❤
नव्या कोऱ्या रूळांवर, ट्रेन धावते एकमद फास्ट
.... राव चला पिक्चरला, पकडू सीट लास्ट
❤❤❤❤
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
.... रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने
❤❤❤❤
देवापुढे लावली समईची जोडी,
.... रावांमुळे आली आयुष्याची गोडी
❤❤❤❤
सासरचे निरंजन, माहेरची फुलवात,
.... रावांचे नाव घेण्यास करते आज सुरुवात
❤❤❤❤
गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं
.... रावांचे नाव, माझ्या मनात कोरलं
❤❤❤❤
नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी,
.... च्या घराण्यात .... रावांची झाले महाराणी
❤❤❤❤
इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून
.... रावांचं नाव घेते .... ची सून
❤❤❤❤
उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल,
....रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल
❤❤❤❤
संसाराच्या देवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा
.... रावांचे नाव घेऊन, आशिर्वाद मागते सौभाग्याचा
❤❤❤❤
Final Worlds: तुम्हाला हे Marathi Ukhane For Female खूप आवडले असतील अशी आशा करतो. पोस्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत पोस्ट Share करायला विसरू नका. धन्यवाद!
0 टिप्पण्या