Marathi Ukhane For Male | मराठी उखाणे नवरदेवासाठी

Marathi Ukhane For Male

 


Marathi Ukhane For Male: नमस्कार मंडळी, मित्रांनो आज आम्ही असा विषय घेऊन आलो आहोत की तो विषय प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, तो म्हणजे लग्न. लग्न हा आपल्या आयुष्यात आणि आपल्या समाजात खूप खास विधी मानला जातो. आपल्या आयुष्यात एका खास जिवलग व्यक्तीची आवश्यकता पूर्ण करण्याचा हा विधी असतो. ती व्यक्ती आपल्याला आयुष्यभर साथ देण्याचं आणि मदत करण्याचं आपल्याला वचन देते आणि समाजाच्या रितीनुसार हा विधी पार पाडला जातो. 

आशा वेळेस अशीच एक अजून रीत म्हणजे नवरा आणि नवरीला उखाणे घेणे. नवविवाहित दाम्पत्याने काही ठराविक कार्यक्रमात आपल्या जोडीदाराबद्दल उखाणे घ्यायचे असतात. अशा वेळेस नवरीचे उखाणे समोरून येत असतील आणि आपल्याला उखाणे जर येत नसतील तर आपल्याला माघार घ्यावी लागते. पण आज आम्ही नवरदेवासाठी उखाणे घेऊन आलो आहोत.

आशा करतो तुम्हाला हे Marathi Ukhane For Male आवडतील.


Marathi Ukhane For Male


चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा

सौ…..चा आणि माझा जान्मोजन्माचा जोडा

ukhane in marathi for male

लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,

….ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.


मराठी उखाणे

कापवर कप सात कप त्यावर ठेवली बशी

माझी बायको सोडून सर्वांच्या बायका म्हशी

दवबिन्दुच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग

सुखी आहे संसारात सौ….. च्या संग

अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना,

…. चे नाव घेण्यास शब्द काही जुळेना.

मराठी उखाणे नवरदेव

बकूळ फुलांचा सडा पडे अंगणी

सौ….. आहे माझी अर्धांगिनी

ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे,

…. सहसंसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे.

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री

…..झाली आज माझी गृहमंत्री

चिमुकल्या ओढ्याची झाली विशाल नदी,

…..च्या बरोबर केली सप्तपदी.

देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान

सौ…..ने दिला मला पतिराजांचा मान

दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती

माझी आणि सौ…..ची अखंड राहो प्रीती

पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे,

………चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.

गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट,

….. नाव घेते सोडा माझी वाट.

वसंतात दरवळतो फुलांचा सुवास

सौ…..सोबत सुरु केला जीवनाचा प्रवास

आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड,

…… चे नाव आहे अमृतपेक्षाही गोड.


संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका,

……चे नाव घेतो सर्वजण ऐका.

चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा

सौ…..चा आणि माझा जान्मोजन्माचा जोडा

आदर्श पती पत्नी म्हणुन सांगतात नल दमयंती,

……नी घास घ्यावा हि माझी पहिलीच विनंती.

सासूबाई आहेत प्रेमळ, मेहुणी आहे हौशी

सौ…..चे नाव घेताना मला होते ख़ुशी

आई वडिलांच्या आशीर्वादाने आला भाग्याचा दिवस,

…..राव पती मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस.

भाजीत भाजी मेथीची,

…… आहे माझ्या प्रितीची

सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप,

……..मला मिळाली आहे माझ्या अनुरूप.

गाडीत गाडी डेक्कन क्वीन,

……. आहे माझी ब्युटी क्वीन.

पुरणपोळीत तुप असावे साजुक,

……. आहेत आमच्या फार नाजुक.

काही शब्द येतात ओठातून,

…… चं नाव येतं मात्र हृदयातून.

लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,

….ची माझ्या र्हुदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.


Final Words: तुम्हाला हे Marathi Ukhane For Male खूप आवडले असतील अशी आशा करतो. पोस्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत पोस्ट share करायला विसरू नका. धन्यवाद!


अधिक बघा: 


Birthday quotes in Marathi


Relationship Quotes in Marathi


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या