Best Motivational Dr Babasaheb Ambedkar Quotes In Marathi

Dr Babasaheb Ambedkar Quotes In Marathi

Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi: भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (भीमराव रामजी आंबेडकर). इ.स. १४ एप्रिल १८९१ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. समाजातील अस्पृश्यतेची भावना नष्ट करण्यास त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांचा जन्म एका अस्पृश्य घरात झाला होता. त्यांचे मूळ गाव रत्नागिरीमध्ये होते.

भीमरावांना शिक्षणाची खूप आवड होती परंतु अस्पृश्य आणि महार समाजातील मुलगा म्हणून त्यांना शाळेत इतर मुलांपासून लांब ठेवले जात होते. मोठ्या कष्टाने त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले पुढे सयाजीराव महाराज याच्या मदतीने त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीत जाऊन एम.ए., एम.एस.सी., डॉक्टरेट आणि लॉ च्या पदव्या घेतल्या. आणि अस्पृश्य लोकांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यास सत्याग्रह केले. त्यांनी महिलांच्या अधिकारासाठी आणि त्यांना समाजात स्थान मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांनी गौतम बुद्धांच्या विचारांना आत्मसात केले.

आंबेडकरांचे खूप सुंदर विचार या पोस्ट मध्ये दिले आहे जे तुम्हाला नक्कीच प्रेरणा देतील आणि तुमच्या ज्ञानातं भर टाकतील.


Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi"शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा !" - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

"जे खरे आहे तेच बोलावे" डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Education quotes in marathi

 

"शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, जो पितो तो गुरगुरल्या शिवाय राहत नाही." डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr Babasaheb Ambedkar Quotes In Marathi

 

"शील, करुणा, विद्या, मैत्री, प्रज्ञा या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे." डॉ. बाबासाहेब आंबेडकर

"मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधीक श्रेयस्कर ठरते." डॉ. बाबासाहेब आंबेडकर

"समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यानेच व्यक्ती विकास होतो" डॉ. बाबासाहेब आंबेडकर

"तिरस्कार माणसाचा नाश करतो." डॉ. बाबासाहेब आंबेडकर

"तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात." डॉ. बाबासाहेब आंबेडकर

"द्वेषाला सहानूभूतीने आणि निष्कपटतेने जिंका." डॉ. बाबासाहेब आंबेडकर

"नशिबामध्ये नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा."

"हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे."

"पावलागणिक स्वत:च्या ज्ञानात भर टाकित जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते."

"पती- पत्नि मधील नातं हे जीवलग मित्रांप्रमाणे असले पाहिजे." डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Marathi Dr Babasaheb Ambedkar Quotes on love

 

"बर्फाच्या राशी उन्हांने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात."

"धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे."

"धर्म हा जर कार्यवाहित राहावयाचा असेल, तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे. कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय."

"तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका."

"बुद्ध हेच खरे विचारवंत होते. त्यांच्यासारखा थोर विचारवंत अजूनपर्यंत जगात झालाच नाही."

"दुसर्याच्या सुख-दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे."

"जो प्रतीकुल  लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्या ईतकी बुद्धी ठेवतात, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र्य आहे असे मी समजतो." 


Dr. Babasaheb Ambedkar Thoughts In Marathi

 

"स्त्री जात समाजाचा अलंकार आहे."

"शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे."

"जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो."

"काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका."

"बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका."

"शंका काढण्यास देखील ज्ञान लागले."

"सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे."

"मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे."

"शक्तिचा उपयोग वेळ-काळ पाहून करावा."

"अग्नी तून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही."

"भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात."

"जेथे एकता तेथेच सुरक्षितता."

"मी नदीच्या प्रवाहालाच वळवणाऱ्या भक्कम खडकासारख आहे."

"मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो."

"माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी."

"मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी, आजन्म विद्यार्थीच आहे."

"समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही."

"जो तो परिश्रम व कर्तुत्व यांच्या जोरावर महत्पदाला चढतो."

"माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसाकरिता आहे."

"वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे, ही एक तपश्चर्या आहे. तिला मन: संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते."

"माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची"


Final words:

तुम्हाला हे Dr Babasaheb Ambedkar Quotes In Marathi खूप आवडले असतील अशी आशा करतो. पोस्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत पोस्ट share करायला विसरू नका. धन्यवाद!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या