Mahatma Phule Quotes In Marathi: सत्यशोधक समाजाचे संस्थापक आणि एक महत्वपूर्ण समाज सुधारक महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले गुरु मानले होते. इ.स. १८२७ मध्ये त्यांचा जन्म झाला होता, दलित लोकांसाठी त्यांनी खूप मोठे काम केले. समाजात स्थान नव्हते आणि अस्पृश्यता समाजामध्ये खूप पसरली होती. दलित लोकांना समाजात कोणतेच अधिकार नव्हते त्यांना पाणी दिले जात नव्हते. कोणत्याही दलित माणसाची सावली आपल्या अंगावर पडल्यास आपण अपवित्र झालो अशी समजूत समाजात होती. त्यांना शिक्षणाचा सुद्धा अधिकार नव्हता. ज्योतिबा फुले एक चांगले लेखक सुद्धा होते ते दलित समाजासाठी पुढे आले आणि त्यांनी खूप साऱ्या शाळा दलित समाजासाठी सुरु केल्या, आणि दलितांना समाजात अधिकार मिळवून दिले. गुलामगिरी बद्दल त्यांनी खूप लेख लिहले, त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
आज आम्ही ज्योतिबा फुलेंचे काही विचार घेऊन आलो आहोत. तुम्हाला हे Mahatma Phule Marathi Thought आवडतील आणि त्यांच्या या विचारांमुळे प्रेरणा मिळेल आणि तुमच्या ज्ञानात भर पडेल अशी आशा करतो.
Mahatma Phule Quotes In Marathi
“सत्य पालन हाच धर्म बाकीचे सर्व अधर्म आहेत.”
❤❤❤❤
“स्व कष्टाने पोट भरा.”
"जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील तर त्यांची जात विचारू नका."
"विद्येविना मती गेली, मती विना निती गेली, नीति विना गती गेली, गति विना वित्त गेले वित्ता विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले."
“आर्थिक विषमता शेतकऱ्यांच्या दैन्यास कारणीभूत आहे.”
"ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात."
"समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता, नैतिकता, प्रगती आणि समृद्धी चा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही."
“स्त्रियांना एक तऱ्हेचा नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात आहे.”
"मनुष्य सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि सर्व मानवांमध्ये स्त्री श्रेष्ठ आहे. महिला आणि पुरुष जन्मापासून मुक्त आहेत. म्हणूनच, दोन्ही अधिकारांना समान हक्क उपभोगण्याची संधी मिळाली पाहिजे."
"भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसच आहे."
"एखादे चांगले काम पूर्ण करण्यासाठी, वाईट उपायांचा वापर करू नका."
"स्वार्थाला वेगवेगळी रूपं मिळतात.हे कधी जातीचे तर कधी धर्माचे रूप धारण करते."
"केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही धंदा आहे, चामाड्यांना शिवणे हा चांभाराचा धर्म नाही धंदा आहे तसेच पूजा पाठ करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून धंदाच आहे."
“मासा पाण्यात खेळतो त्याला गुरूची आवश्यकता नसते.”
“मानवासाठी अनेक धर्म अस्तित्वात आले पण धर्म सगळ्या मानवांसाठी का निर्माण झाला नाही.”
"नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे."
“सत्कर्म करण्याने वैभव मिळणार नाही परंतु शांती‚ सुख मिळेल, तर दुष्कर्म करण्याने वैभव मिळेल पण शांती‚ सुख मिळणार नाही, हे निश्चित.”
"प्रवाहाच्या विरुध्द दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात ज्यांना कुठलेतरी उध्दिष्ट गाठायचे असते."
“दुसऱ्या व्यक्तीचे हक्क हिरावून घेवू नका.”
"जोपर्यंत अन्न आणि वैवाहिक संबंधांवर जातीय संबंध कायम राहतील तोपर्यंत राष्ट्रवादाची भावना विकसित होणार नाही."
“कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नका.”
0 टिप्पण्या