![]() |
Makar Sankranti Wishes In Marathi |
पौष शुक्ल पक्षामध्ये येणारा मकर संक्रांती हा सण हिंदू धर्मामध्ये विशेष रित्या पार पडला जातो. ह्या दिवशी तीळ आणि गुळाचे लाडू बनवून आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आणि शत्रूंनाही सर्व गैरसमज विसरून "तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला" असे म्हणत हे गोड लाडू दिले जातात. तिळगुळाच्या ह्या सणाच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून ह्याला उत्तरायण देखील म्हणतात.
भारताच्या वेगवेगळ्या भागात संक्रांती सण निरनिराळ्या पद्धतीने साजरा केला जातो. हा सण व्रत आणि उपवास करून, गंगेमध्ये स्नान करून किंवा सूर्याची पूजा करून अशा काही पद्धतीने साजरा केला जातो. ह्या दिवशी घरी तिळगुळ लाडू बनविण्या व्यतिरिक्त पतंग उडवणे, रांगोळी काढणे, काळे कपडे परिधान करणे अशा काही प्रथा चालत आल्या आहेत आणि प्रत्येक जण ह्याचा खूप आनंद घेतात. आणि महाराष्ट्रात तर हा दिवस खूप आनंदात पार पडतो.
पुढे Makar Sankranti Wishes In Marathi मकर संक्रांतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ज्या तुम्ही आपल्या मित्रांना नातेवाईकांना पाठवून संक्रांतीच्या शुभेच्छा देऊ शकता.
Makar Sankranti Wishes In Marathi | मकर संक्रांती 2021
![]() |
TilGul Ghya God God Bola |
तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
❤❤❤❤
![]() |
Makar Sankranti Images Marathi |
कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला… मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
❤❤❤❤
नवीन वर्षाच्या नवीन सणाच्या, गोड मित्रांना “मकर संक्रातीच्या” गोड गोड शुभेच्छा!
❤❤❤❤
मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवसाच्या आपल्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा… भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!
❤❤❤❤
![]() |
Marathi Makara Sankranti Wishes |
विसरुनी जा दुःख तुझे हे, मनालाही दे तू विसावा.. आयुष्याचा पतंग तुझा हा, प्रत्येक क्षणी गगनी भिडावा शुभ संक्रांत!
❤❤❤❤
आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोड़वा, स्नेह वाढवा… “तिळगुळ घ्या गोड गोड बोला”
❤❤❤❤
तिळाची उब लाभो तुम्हाला, गुळाचा गोड़वा येवो जीवनाला, यशाची पतंग उड़ो गगना वरती, तुम्हास अणि तुमच्या परिवारास… SHUBH SANKRANTI!
❤❤❤❤
नाते अपुले हळुवार जपायचे… तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत अधिकाधिक दॄढ करायचे… मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
❤❤❤❤
वर्ष सरले डिसेंबर गेला, हर्ष घेऊनी जानेवारी आला, निसर्ग सारा दवाने ओला, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला सर्वांना मकर संक्रांतीच्या संदेशरुपी गोड गोड शुभेछा!
❤❤❤❤
एक तिळ रुसला, फुगला, रडत रडत गुळाच्या पाकात पडला .. खुदकन हसला हातावर येताच बोलू लागला, तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!
❤❤❤❤
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!! मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
❤❤❤❤
![]() |
शुभ मकर संक्रांती |
दुःख सारे विसरून जाऊ, गोड-गोड बोलून आनंदाने राहु, नवीन उत्सवाचे स्वागत करू चला, तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला… शुभ मकर संक्रांती!
❤❤❤❤
आकाशाला टेकतील असे हात नाहीत माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे, चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे, पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे. तिळगुळ घ्या गोड़ बोला!
❤❤❤❤
गगनात उंच उडता पतंग, संथ हवेची त्याला साथ, मैत्रीचा हा नाजूक बंध नाते अपुले राहो अखंड मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
❤❤❤❤
कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो, पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो, असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा, आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या..., मकरसंक्राती हादिक शुभेच्छा! तिळगुळ घ्या गोड बोला!
❤❤❤❤
"शब्द रुपी तिळगूळ घ्या, गोड बोलतच आहात तसेच बोलत रहा" मकर संक्रांत हा एक गोड सण आहे. तुम्हाला शुभेच्छा देण्याचे एक निमित्त आहे. ही मकर संक्रांत तुम्हाला व कुटुंबातील सर्व सदस्यांना येत्या वर्षात खूप भरभराट, सुखसम्रुध्दी व उत्तम आयुआरोग्य घेऊन येवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना!
❤❤❤❤
गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या… मनातील कडवापणा बाहेर पडू द्या… या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या… उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे…!! सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!! श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…!! शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…!! दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे, “भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!
❤❤❤❤
Final words: तुम्हाला हे Makar Sankranti Wishes In Marathi खूप आवडले असतील अशी आशा करतो. पोस्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत पोस्ट share करायला विसरू नका. धन्यवाद!
0 टिप्पण्या