MESMA act in Marathi ? MESMA कायदा काय आहे?

MESMA act in Marathi ? MESMA कायदा काय आहे? 

एसटी संपादरम्यान बडतर्फ झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले जाणार नसल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांनी दिली आहे. तसेच जे एसटी महामंडळाचे कर्मचारी कामावर येत नाहीत त्यांच्यावर एमईएसएम कायद्यान्वये कारवाई होण्याची शक्यता आहे. पण मेस्मा म्हणजे नक्की काय? मेस्मा कधी वापरला जातो? मेस्मा कायद्याबद्दल अधिक जाणून घ्या

 केंद्र सरकारच्या कायद्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा (मेस्मा) लागू केला जाऊ शकतो. एसटी संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात राज्य सरकार अखेर मेस्माचे हत्यार वापरणार आहे.

लोकांच्या दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक सुविधांची देखभाल आणि व्यवस्थापित करणे आवश्यक आहे. हे काम शासनाचे असते. परंतु काही सार्वजनिक सुविधा कामगारांच्या आंदोलनामुळे किंवा मोर्च्यांमुळे सार्वजनिक सुविधांवर बाधा येतात. 

अशा वेळी अत्यावश्यक सेवा सुरळीत राहण्यासाठी mesma कायद्याचा वापर केला जातो. 


MESMA act in Marathi ? MESMA कायदा काय आहे?


महाराष्ट्र लोकसेवा आयोग , Abandoned meaning in Marathi BHMS म्हणजे काय ?


Mesma कायदा काय आहे ? 

  • नागरिकांना काही अत्यावश्यक सेवा मिळाव्यात. त्यासाठी हा कायदा वापरला जातो. मेस्माचा वापर मोर्चा आंदोलन आणि रॅली थांबवण्यासाठी केला जातो ज्यामुळे साठेबाजी आणि अत्यावश्यक सेवा विस्कळीत करणाऱ्या मोर्च्यांना रोखता येते.
  • केंद्र सरकारने 1968 मध्ये हा कायदा केला. त्यानंतर हा कायदा लागू करण्याचे अधिकार राज्यांनाही मिळाले.
  • अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या लोकांनी किंवा संघटने संप केल्यास तो संप रोखण्यासाठी हा कायदा लागू करण्यात येतो.
  • तो कायदा झाल्यानंतर 6 आठवडे लागू राहू शकतो. हा कायदा जास्तीत जास्त 6 महिन्यांच्या कालावधीसाठी लागू केला जाऊ शकतो.
  • कायदा झाल्यानंतरही संप सुरू ठेवणाऱ्या आणि अत्यावश्यक सेवा विस्कळीत करणाऱ्या कामगारांवर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार सरकारला आहे.
  •  मेस्मा हा राज्यसरकारचा असा अधिकार आहे कि, जर कोणत्या कर्मचारी संघटनांनी नागरीकांना मिळणाऱ्या अत्यावश्यक सेवा विस्कळीत केल्या तर त्या संबंधीत कर्मचारी आणि लोकांवर राज्य सरकार कारवाई करू शकते. त्यासाठी कर्मचाऱ्यांचा संप हि मोडीत काढू शकतात.\
  • या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विना वॉरंट अटक करण्याचाही सरकारला अधिकार आहे. त्यात तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे.


सध्या 18 हजार 882 कर्मचारी कामावर रुजू झाले

एसटी कामगारांचा संप आजही सुरूच आहे. विलीनीकरणाशिवाय सरकार मागे हटणार नाही, यावर कर्मचारी ठाम आहेत. सध्या 18 हजार 882 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत आणि आतापर्यंत 9 हजार 141 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

1 हजार 928 जणांना टर्मिनेट करण्यात आले आहे.

Previous Post Next Post