Dharmveer - mukkam post thane movie trailer, धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे.
'जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझाशी वैर नाही घ्यायचं' हा डायलॉग सध्या सोसिअल मीडिया वर तुफान वायरल होत आहे. कुठल्याही बँकेत साधं अकाउंट नसलेला आणि दोन्ही खिसे रिमकामे असलेला जगातील सर्वात श्रीमंत माणूस ते म्हणजे ठाण्यातील ढाण्यावाघ धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जीवनावर धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे हा मराठी सिनेमा येत आहे. आनंद दिघे यांचा राजकीय आणि सामाजिक जीवन प्रवास या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. आनंद दिघे जनसामान्यांचे नेते नाही तर जनसामान्यांचा आधार होते. जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात दिघे साहेबानी आपल पूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यामुळेच त्यांचा जीवन प्रवास लवकरच रुपेरी रुपेरी पडद्यावर दाखवण्यात येणार आहे.
या चित्रपटात प्रसाद ओक हे दिघे साहेबांच्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्टस् आणि झी स्टडीओज ने केली आहे. प्रवीण तरडे यांचे दिग्दर्शक असलेला धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट १३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
धर्मवीर आनंद दिघे साहेब म्हणजे शोषित गरिबांच्या अन्यायाला वाचा फोडणारे, गरिबांसाठी सेवेसाठी धावून घेणारे आणि तळागाळातील लोकांचा विचार करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. सामान्य माणसाच्या कोणत्याही समस्या असू दे ती समस्या सोडवणे याच जणू साहेबानी व्रतच घेतलं होत. या अशाच कामातून त्यांनी अनेक लोक जोडली.
आनंद दिघे यांचा जन्म २७ जानेवारी १९५२ साली झाला. त्यांचं घर टेंभी नका परिसरात होते. त्यांचं पूर्ण नाव आनंद चिंतामणी दिघे होते. लोक सेवेसाठी त्यांनी आपल्या घरावर जणू तुळशीपत्रच ठेवले होते.
एक सच्च्या शिवसैनिक
टेंभी नाक्या परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा होत असत. तरुण आनंद दिघे बाळासाहेबांच्या सभांना उपस्थित राहत असत. बाळासाहेबांच्या वक्तृत्व आणि व्यक्तीमहत्वाकडे दिघे साहेब एवढे आकर्षित झाले होते कि जशी बाळासाहेबांनी त्यांच्यावर मोहिनीच केली होती. त्यांनी पूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी देण्याचं ठरवलं त्यामुळे त्यांनी लग्न सुद्धा केले नाही. ते शिवसेनेचे फुल तिने कार्यकर्ते होते. बाळासाहेबांनी त्यांच्यावर जिल्हाप्रमुखाची जबाबदारी सोपवली होती.
दिघे साहेबांचा जनता दरबार
दिघे साहेबांनी टेंभी नका परिसरात आनंद आश्रमाची स्थापना केली होती. या आश्रमात जनता दरबार भरायचा. परिसरातील लोक आपल्या समस्या घेऊन येत असत. लोक त्यांना आपल्या समस्या सांगायचे आणि ते तत्काळ सोडवायचे. लोक आपली समस्या घेऊन सकाळी ६ वाजल्या पासून आनंद आश्रमात जमा होत असत.
दिघे साहेबांबद्दल सांगायला गेल्यास खूप काही आहे. ते आपण धर्मवीर - मु. पो. ठाणे या चित्रपटात पाहू.